विठ्ठलभक्तीचा अपार महिमा !

एकादशीच्या दिवशी श्रीविष्णुस्पंदने पृथ्वीवर अधिक प्रमाणात येतात, तसेच आषाढी आणि कार्तिकी एकादशी या तिथींना पृथ्वीवर विष्णुस्पंदने वर्षातील अन्य एकादशींपेक्षा जास्त प्रमाणात येतात; म्हणून या दोन एकादशींना जास्त महत्त्व आहे. आषाढी एकादशीच्या तिथीला चातुर्मास प्रारंभ होतो. याच तिथीला वारकरी पांडुरंगाला भेटण्यासाठी पंढरपुरात जातात.

‘विठुमाऊली’ विशेषांकाच्या निमित्त विठ्ठलाचे महत्त्व, विठ्ठलाची भक्ती कशी करावी ? वारकरी पांडुरंगाच्या नामाचा गजर करत देहभान विसरून विठ्ठलाच्या भेटीच्या ओढीने कसे पंढरपूर येथे जातात ? पायी वारी करतांना त्यांना येणार्‍या अनुभूती, वारीची अनेक वर्षांची परंपरा आणि अनेक संतांना विठ्ठलाने दिलेल्या अनुभूती विठुरायाच्या चरणी समर्पित करत आहोत !