दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचक अभिप्राय
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या दैनंदिन वाचनामुळे समाजामध्ये घडत असणार्या अनेक धर्मविरोधी, तसेच समाजविघातक गोष्टी समजतात. लव्ह जिहाद, भूमी (लँड) जिहाद, हलाल जिहाद या विषयांवरील जागृतीपर लेख, तसेच आपले धार्मिक सण, व्रते आणि उत्सव या संदर्भात हेतूपुरस्सर केला जाणारा अपप्रचार या विषयांवरील लेख अन् अन्य अनेक सदरे या विषयांवरील लेख वाचून समाजामध्ये वावरतांना प्रत्यक्षात काय काळजी घ्यायची ? हे समजते.
आधीपासूनच अध्यात्माची आवड असल्यामुळे माझ्या मनामध्ये धर्माविषयी, तसेच चालीरिती, परंपरा यांविषयी अनेक शंका-कुशंका मनामध्ये होत्या. उदा. ‘सण-उत्सव यांचे महत्त्व काय ? तसेच ते कसे साजरे करावेत ?’लेख वाचून शास्त्रीय पद्धतीनुसार सण, व्रते, उत्सव साजरे करतांना पुष्कळ आनंद मिळत आहे.
१. विविध उपचार पद्धतींवरील लेखांतून नाविन्यपूर्ण उपचारांसाठी साहाय्य होते
मी स्वतः एक पंचगव्य निसर्गोपचार वैद्य आहे. दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये वैद्यकीय क्षेत्रातील अनेक लेख असतात. मी हे सर्व लेख नेहमी वाचतो. त्याचा मला दैनंदिन जीवनामध्ये पुष्कळ लाभ होतो. अनेक रुग्णांना समुपदेशन देण्यास, तसेच नाविन्यपूर्ण उपचार करण्यात पुष्कळ साहाय्य होते.
२. श्री गुरूंच्या दैनंदिन संदेशातून बौद्धिक क्षमतेत वाढ होणे !
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या मुखपृष्ठावर उजव्या बाजूच्या कोपर्यामध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे तेजस्वी विचार प्रकाशित केलेले असतात. त्यांच्या नियमित वाचनाने बौद्धिक क्षमतेमध्ये प्रचंड वाढ होते, असा माझा स्वतःचा अनुभव आहे.
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वाचनातूनच सेवेचे महत्त्व लक्षात आल्यावर दैनिक ‘सनातन प्रभात’च्या अंक वितरणाची सेवा करण्यास मला प्रोत्साहन मिळाले. वितरण सेवेतून श्री गुरूंचे संदेश पत्र समाजात पोचवण्यात असलेला आनंद मला आता अनुभवायला मिळत आहे.
यासाठी श्री गुरूंच्या चरणी मी अनंत अनंत कोटी वेळा कृतज्ञता व्यक्त करतो…!
– वैद्य नितेश रमेश जाधव, संचालक, ‘पंचगव्य निसर्गोपचार केंद्र’, मिरज; नाडी परीक्षक आणि गोकुळनंदन गोशाळा