१८ जूनला भूमीपूजन !
नागपूर – येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या वतीने महाराज बाग जवळील नागपूर विद्यापीठ परिसरात सिंहासनारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या ४१ फुटांच्या पुतळ्याची स्थापना करण्यात येणार आहे. येत्या १८ जून या दिवशी या पुतळ्याचा भूमीपूजन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विरोधी पक्षनेते अजित पवार येणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा जगातील सर्वांत मोठा सिंहासनारूढ पुतळा ठरणार आहे.
Chhatrapati Shivaji Maharaj : शिवरायांचा सर्वात मोठा सिंहासनारुढ पुतळा नागपुरात स्थापित होणार, 18 जून रोजी भूमिपूजन https://t.co/RMLEScFY52 @RajatVAbp#NagpurNews #chhatrapatishivajimaharaj
— ABP माझा (@abpmajhatv) June 9, 2023
यंदा नागपूर विद्यापिठाचे शताब्दी महोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीच्या नेतृत्वात लोकसहभागातून हा भव्य पुतळा साकारला जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा सिंहासनारूढ पुतळा ‘ब्राँझ’ धातूचा असेल. त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनालयातून रीतसर अनुमती घेण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळाच्या चबुतर्याची लांबी २० फूट, रुंदी १५ फूट, तर उंची ९ फूट असेल. सिंहासनारूढ पुतळ्याची उंची ४१ फूट असून त्यावरील छत्र ७ फुटांचे असेल. ब्राँझ धातूने बनवल्या जाणार्या या पुतळ्याचे वजन अनुमाने १० सहस्र किलो असण्याची शक्यता आहे.