साक्षीच्‍या हत्‍येच्‍या निषेधार्थ अभाविपची कोल्‍हापूर येथे निदर्शने !

निदर्शने करतांना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते

कोल्‍हापूर, १ जून (वार्ता.) – देहली येथील शाहबाद डेअरी परिसरात साहिल नावाच्‍या २० वर्षीय मुसलमान तरुणाने १६ वर्षीय हिंदु मुलगी साक्षी हिची हत्‍या केली. साक्षीच्‍या हत्‍येच्‍या निषेधार्थ आणि ‘लव्‍ह जिहाद’विरोधी कठोर कायदा करण्‍यात यावा’, या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्‍या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक येथे १ जूनला निदर्शने करण्‍यात आली. या प्रसंगी प्राजक्‍ता काळे, स्‍वप्‍नील पाटील, हर्षवर्धन रेपे, प्रसाद लष्‍कर यांसह अन्‍य कार्यकर्ते उपस्‍थित होते.