कोरोना महामारीच्‍या काळात खरेदी केलेल्‍या २५ कोटी रुपयांच्‍या रेमडेसिव्‍हिर इंजेक्‍शनच्‍या कुप्‍या (वायल्‍स) कालबाह्य !

( संग्रहीत छायाचित्र )

पुणे – कोरोना महामारीच्‍या काळात खरेदी केलेल्‍या दोन लाख ४० सहस्र रेमडेसिव्‍हिर इंजेक्‍शनच्‍या कुप्‍या (वायल्‍स) कालबाह्य झाल्‍या आहेत. हा साठा कालबाह्य होण्‍यापूर्वी संबंधित अस्‍थापनांना पाठवून त्‍याविषयी इतर औषधांचा साठा मागवता आला असता; मात्र आरोग्‍य विभागाने तशी कार्यवाही केली नाही.

 

हेमंत संभूस                                                                        

महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेच्‍या जनाधिकार सेनेने आरोग्‍य विभाग संचालक नितीन अंबाडेकर यांच्‍याशी संपर्क करून इंजेक्‍शनच्‍या कुप्‍या कालबाह्य होत असल्‍याचे निदर्शनास आणून दिले होते. हा साठा कालबाह्य होण्‍यामागे कोणते अधिकारी उत्तरदायी आहेत ? याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्‍याचे मागणी मनसेचे सरचिटणीस हेमंत संभूस यांनी केली.

संपादकीय भूमिका

अधिकार्‍यांवर नुसती कारवाई होण्‍यासमवेत इंजेक्‍शनची होणारी रक्‍कम त्‍यांच्‍या वेतनामधून वसूल करून घ्‍यावी !