२ सहस्र रुपयांच्‍या नोटांची छपाई बंद ! – रिझर्व्‍ह बँकेचा निर्णय

चलनातील नोटा ३० सप्‍टेंबरपर्यंत बँकेतून पालटून घेण्‍याचे आवाहन

मुंबई – भारतीय रिझर्व्‍ह बँकेने २ सहस्र रुपयांच्‍या नोटा बंद करण्‍याचा निर्णय घेतला आहे. सध्‍या चलनात असलेल्‍या २ सहस्र रुपयांच्‍या नोटा ३० सप्‍टेंबरपर्यंत वापरता येणार आहेत.

(चित्रावर क्लिक करा)

त्‍यापूर्वी त्‍या बँकेत जमा करून दुसर्‍या नोटा घ्‍या, असे आवाहनही रिझर्व्‍ह बँकेने केले आहे. २ सहस्र रुपयांच्‍या नोटा केंद्र सरकारने नोटबंदीच्‍या वेळी छापल्‍या होत्‍या.