भक्तीसत्संगाच्या वेळी भ्रमणभाषवरील भगवान शिवाच्या चित्रावर सर्वत्र दैवीकण दिसून भावजागृती होणे

सौ. जयश्री बक्षी

‘१६ फेब्रुवारी २०२३ या दिवशी झालेल्या ‘ऑनलाईन’ भक्तीसत्संगात महाशिवरात्रीनिमित्त भगवान शिव यांचे चित्र दाखवत होते. तेव्हा मला भगवान शिव यांच्या चित्रावर सर्वत्र दैवीकण दिसत होते. ‘हे चित्र असे का चमकत आहे ?’, हे आरंभी माझ्या लक्षात येत नव्हते; म्हणून मी भ्रमणभाषचा ‘स्क्रीन’ वेगवेगळ्या दिशेने हलवून पाहिला. त्या वेळी त्या चित्रावर पुष्कळ दैवी कण असल्याचे माझ्या लक्षात आले. त्या दैवी कणांकडे बघून माझ्या मनात कृतज्ञताभाव निर्माण झाला आणि माझी भावजागृती झाली. हे दैवी कण मला भक्तीसत्संग संपेपर्यंत दिसत होते. त्या वेळी ‘गुरुदेवांची किती कृपा आहे !’, असे मला वाटले. सत्संगात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या गोड आवाजामुळे मला आनंदाची अनुभूती येत होती. ही अनुभूती दिल्याबद्दल श्री गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त झाली.’

– सौ. जयश्री बक्षी, नागपूर (१६.२.२०२३)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक