सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी विचारलेल्या प्रश्नाचे सूक्ष्म-ज्ञानप्राप्तकर्त्या साधिकेने दिलेले ज्ञानमय उत्तर !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

प्रश्न : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : ज्ञानप्राप्तकर्त्या काही साधकांना आता सूक्ष्मातून ज्ञान मिळण्याचे प्रमाण अल्प झाले आहे, तर काहींना सूक्ष्मातून ज्ञान मिळत नाही. याचे कारण काय ? (४.९.२०२४)

सुश्री (कु.) मधुरा भोसले

उत्तर :

१. ‘साधकांना सूक्ष्मातून ज्ञान मिळण्याचे प्रमाण अल्प होणे किंवा न मिळणे’ यामागील विविध घटक, त्यांचे महत्त्व आणि त्यांचा सूक्ष्म ज्ञानाच्या प्राप्तीवर होणारा सूक्ष्म परिणाम !

जेव्हा साधकाला होणारा वाईट शक्तींचा त्रास न्यून होतो, तेव्हा त्याच्याकडून व्यष्टी आणि समष्टी साधनेसाठी ईश्वराला अपेक्षित असे प्रयत्न होऊ लागतात. त्यानंतर त्याच्यावर श्री गुरूंची कृपा होऊन त्याला पुन्हा सूक्ष्मातील ज्ञान मिळू लागते.’

– सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ४१ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक आणि टंकलेखन करण्याची वेळ १६.९.२०२४ दुपारी २ ते २.१०)

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.