साम्यवाद्यांकडून कणेरी मठ आणि पंचमहाभूत लोकोत्सव यांच्या अपकीर्तीचा प्रयत्न !

गायींच्या मृत्यूचे प्रकरण

कोल्हापूर – पंचमहाभूत लोकोत्सवात गायींचा मृत्यू झाल्यावर त्याचे भांडवल करत काही साम्यवादी विचारवंत समाजमाध्यमातून कणेरी मठ आणि ‘पंचमहाभूत लोकोत्सव’ यांची अपकीर्ती करण्याचा प्रयत्न करत आहेत. १२ गायी मृत्यूमुखी पडलेल्या असतांना हा आकडाही अकारण वाढवून सांगितला. ‘रुग्णाईत गायींना विज्ञानच वाचवणार आहे, गायी मृत्यूमुखी पडतांना, तसेच रुग्णाईत झाल्यावर पशूवैद्यकीय अधिकार्‍यांची आवश्यकता काय ? ’, असे निरर्थक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. महोत्सवाच्या माध्यमातून हिंदु धर्म आणि संस्कृती यांविषयी लोकांना माहिती दिली जात असतांना त्यावरही टीका केली जात आहे.