मुसलमान बंदीवानांनी हिंदू बंदीवानांना त्रास देण्याच्या क्लृप्तीला स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी दिलेले प्रत्युत्तर !

स्वातंत्र्यवीर सावरकर

‘सेल्यूलर जेलमध्ये जेव्हा कोणतेही जहाज यायचे, तेव्हा माल उतरवून घेण्यासाठी कारागृहामधील बंदीवानांना बाहेर घेऊन जायचे. त्या दिवशी त्यांना भोजन दिले जात नसे; त्याऐवजी त्यांना लाह्या, चणे इत्यादी सुके पदार्थ दिले जायचे; परंतु मुसलमान बंदीवान त्या पदार्थांना मुद्दामहून स्पर्श करायचे. मुसलमानांनी स्पर्श केलेले खाद्यपदार्थ हिंदू खात नव्हते आणि मुसलमान बंदीवान हिंदूंना वाकुल्या दाखवून दुप्पट खायचे. त्यामुळे हिंदु बंदीवान दिवसभर भुकेलेलेच रहायचे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी यावर एक उपाय काढला. त्यांनी ‘ॐ नम: शिवाय ।’, असे म्हणत त्या खाद्यपदार्थांना पुन्हा स्पर्श केला आणि घोषित केले, ‘‘आता या भोजनाची अपवित्रता नष्ट झाली आहे. आता तुम्ही मुसलमानांना सांगा की, घ्या. तुम्ही हे खाल्ले, तर तुम्ही सुद्धा हिंदु होऊन जाल.’’ या उपायामुळे हिंदु बंदीवानांची फार मोठी समस्या सुटली.

सावरकर यांनी म्हटले, ‘‘बंधूंनो, आपला हिंदु धर्म पुष्कळच शक्तीशाली आहे. तो सर्वकाही पचवू शकतो. हिंदु धर्माने हूण आणि शक यांना सुद्धा संपूर्णपणे पचवले आहे. त्याच्यासमोर मुसलमानांच्या हातचे पाणी आणि अन्न यांची काय गोष्ट ! आम्ही पूर्ण मुसलमानाला जरी खाल्ले, तरीही हिंदु म्हणूनच राहू.’

(साभार : मासिक ‘गीता स्वाध्याय’, फेब्रुवारी २०२१)