(म्हणे) ‘मी हिंदुविरोधी नाही, तर मनुवादविरोधी !’ – काँग्रेस नेते सिद्धरामय्या

काँग्रेस नेते सिद्धरामय्या

बेंगळुरू (कर्नाटक) – मला हिंदु धर्मविरोधी म्हणतात; परंतु मी हिंदु धर्मविरोधी नाही. मी हिंदूच आहे. मी मनुवादाचा विरोधी आहे. हिंदुत्वविरोधी आहे. हिंदु धर्म वेगळा आणि हिंदुत्व वेगळे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी व्यक्त केली आहे. नुकतेच त्यांनी हिंदु धर्माविषयी आक्षेपार्ह विधान केल्याने त्यांच्यावर टीका होऊ लागल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

संपादकीय भूमिका 

  • सिद्धरामय्या यांनी कधी मनुस्मृतीचा अभ्यास केला आहे का ? अभ्यास केला असता, तर त्यांनी कधी असे विधान केले नसते ! केवळ दलितांची मते मिळवण्यासाठी हिंदूंच्या महान धर्मग्रंथांवर अशा प्रकारे विधान करणे हिंदुविरोधीच आहे, हे लक्षात घ्या !
  • जिहादी आतंकवाद कोणत्या पुस्तकामुळे होतो, हे सिद्धरामय्या कधी बोलण्याचे धाडस करणार नाहीत; मात्र हिंदु सहिष्णु असल्याने ते त्यांच्या धर्मग्रंथांवर अभ्यासहीन बोलण्याचे धाडस करतात !