भारत देश महान झाला पाहिजे, हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे स्वप्न पूर्ण करणे आपले दायित्व ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

कोलकाता (बंगाल) – भारत हा महान देश व्हावा, हे स्वप्न नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पाहिले होते. ते आजही अपूर्ण राहिले आहे. ते पूर्ण करण्याचे दायित्व आपले आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी येथे केले. नेताजी बोस यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.