व्यायाम करायला वेळ मिळत नाही ?

निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक १२४

वैद्य मेघराज पराडकर

‘एक माणूस कुर्‍हाडीने एक झाड तोडत होता. बराच वेळ प्रयत्न करूनही झाड तोडले जात नव्हते. त्या वेळी तेथे एक अनुभवी लाकूडतोड्या पोचला. त्याने झाड तोडणार्‍या माणसाला ‘कुर्‍हाडीला धार काढ’, असे सांगितले. त्या वेळी झाड तोडत असलेला माणूस म्हणाला, ‘‘सकाळपासून ५ घंटे झाले, मी हे झाड तोडत आहे. आता कुठे हे अर्धे तुटत आले आहे. मला अजून केवळ ३ घंटेच वेळ आहे. मी कुर्‍हाडीला धार काढत बसलो, तर त्यातच माझा अर्धा घंटा वाया जाईल. त्यापेक्षा मी करतो तेच योग्य आहे.’’ ‘हा माणूस सांगून काही ऐकणारा नाही’, हे लक्षात आल्यावर लाकूडतोड्या तेथून निघून गेला.

ही गोष्ट वाचून झाड तोडणार्‍या माणसाला तुम्ही कोणती विशेषणे लावाल ? या गोष्टीमध्ये कुर्‍हाडीला धार काढण्याचे जे महत्त्व, तेच प्रतिदिन व्यायाम करण्याचे आहे. यातून बोध घेऊन नियमित व्यायाम करावा. ‘लाकूडतोड्या’ पुनःपुन्हा हे सांगायला येणार नाही’, हे लक्षात घ्यावे.’

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.१२.२०२२)