हिंदु संस्कृतीचे महत्त्व जाणा !

‘ज्येष्ठांनी केवळ देव-देवार्चन आणि पूजापाठ यांत वेळ घालवावा’, असे मनावर ठसवले जाते; परंतु ज्येष्ठ बंधू-भगिनींनो, आपापल्या क्षमतेप्रमाणे ज्याला जे रुचेल, जमेल त्याप्रमाणे उर्वरित काळ अधिकाधिक मजेत घालवावा.’ – एक लेखक

(‘आपला वेळ मौजमजेत घालवावा’, हा विचार पाश्चात्त्यांचा आहे. या विचारसरणीमुळे मनुष्य रज-तम गुणांच्या अधीन रहातो. हिंदु संस्कृतीत धर्माचरणाला महत्त्व आहे. धर्माचरण करून स्वतःतील सत्त्वगुण वाढवणे, म्हणजेच साधना करून ‘ईश्वरप्राप्ती करणे’ हा मनुष्यजन्माचा मूळ उद्देश असतो. हे साध्य करण्यासाठी म्हातारपणी नव्हे, तर लहानपणापासूनच प्रयत्न करणे आवश्यक आहे. हे संस्कार मनावर रुजवण्यासाठीच आई-वडील आणि शिक्षक ओरडतात, मारतात किंवा प्रसंगी शिक्षाही करतात; कारण आयुष्यभर ‘खा, प्या आणि मजा करा’, हा संस्कार दृढ झाल्यास म्हातारपणी, म्हणजे वानप्रस्थाश्रमी या मायेतील विचारांतून स्वतःला बाहेर काढणे आणि चित्त देवाच्या चरणी स्थिर करणे मनुष्याला कठीण जाईल.’ – संकलक)