बरेली (उत्तरप्रदेश) – येथील एका रसवंतीगृहात (उसाच्या रसाच्या दुकानात) बर्फाच्या पेटीत मांस सापडल्याने खळबळ उडाली आहे. दुकानदाराने बर्फाच्या तुकड्यांमध्ये मांसाचे तुकडे काळ्या रंगाच्या कागदामध्ये गुंडाळून ठेवले होते. हिंदु युवा वाहिनीचे कार्यकर्ते कमल राणा यांनी, ‘मी दुकानदार अच्छे मियाँ (फैजल) याला हे कृत्य करतांना पाहिले’, असा आरोप केला आहे. या प्रकरणाचा व्हिडिओ सामाजिक संकेतस्थळावर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला आहे. पोलिसांनी फैझल याला अटक केली आहे. या प्रकरणी पुढील अन्वेषण चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
१. हिंदु युवा वाहिनीचे कार्यकर्ते कमल राणा दीदीपुरम चौकात ऊसाचा रस प्यायला गेले होते. तेथील बर्फाच्या पेटीत लाल रंग पाहून त्यांना संशय आला.
२. त्यांनी दुकानदार फैझल याला बर्फाची पेटी उघडण्यास सांगितले. बर्फाच्या तुकड्यांमध्ये मांसाचे तुकडे काळ्या रंगाच्या कागदामध्ये गुंडाळून ठेवल्याचे त्यांना आढळले. त्याविषयी विचारणा करताच दुकानदार रागवला आणि भांडू लागला. यानंतर राणा यांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली.
३. हिंदु युवा वाहिनीने हा एका मोठ्या षड्यंत्राचा भाग असल्याचा आरोप करत, ‘लोकांचा धर्म भ्रष्ट करण्याचा हा डाव आहे’, असे म्हटले आहे. फैजलच्या विरोधात योग्य कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कमल यांनी केली आहे.
सौजन्य : ZEE NEWS
संपादकीय भूमिका
|