सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना केवळ नामजपादी उपाय विचारल्यावर आणि त्यांनी उपाय सांगितल्यावर तो आणखी न्यून होत असणारा त्रास

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना केवळ नामजपादी उपाय विचारल्यावर त्रास काही प्रमाणात न्यून होत असणे आणि त्यांनी उपाय सांगितल्यावर तो आणखी न्यून होत असणे

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ 
सौ. शौर्या मेहता

‘जेव्हा मला आध्यात्मिक त्रास होतो, तेव्हा मी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना मला होणारा त्रास भ्रमणभाषवर लिहून त्यांना पाठवते. तेव्हा असे लक्षात येते की, मला होत असलेला त्रास २५ टक्के न्यून झाला आहे. जेव्हा ते मी भ्रमणभाषवर पाठवलेला माझ्या त्रासाचा मजकूर वाचतात आणि माझ्यासाठी नामजपादी उपाय शोधतात, तेव्हा माझा त्रास आणखी २५ टक्क्यांनी न्यून होऊन तो ५० टक्केच शिल्लक रहातो. हे मी आतापर्यंत पुष्कळ वेळा अनुभवले आहे.’

– सौ. शौर्या सुनील मेहता (आध्यात्मिक पातळी ६९ टक्के), मडगाव, गोवा. (१२.९.२०२२)

(सौ. शौर्या मेहता यांनी येथे दिल्याप्रमाणेच अनेक साधक मला सांगतात. ते म्हणतात, ‘तुम्हाला आमचा त्रास कळवल्यावर लगेचच आमचा त्रास काही प्रमाणात अल्प होतो आणि तुम्ही उपाय सांगितल्यावर तो आणखी अल्प होतो.’ – (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ (१५.९.२०२२))

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक