देवाची आवड असलेला ५२ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला पुणे येथील चि. रुद्र सचिन कटके (वय १ वर्ष) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी !  चि. रुद्र सचिन कटके हा या पिढीतील एक आहे !

पुणे येथील चि. रुद्र सचिन कटके याची त्याच्या कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

चि. रुद्र सचिन कटके


‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले


पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. जन्मापूर्वी

अ. ‘मला गर्भधारणा होण्यापूर्वी ‘अकस्मात् स्तोत्रे म्हणावीत’, असे वाटू लागले. मी प्रतिदिन श्री गणपतिस्तोत्र, श्रीरामरक्षा स्तोत्र, हनुमान स्तोत्र आणि हनुमानचालिसा म्हणत असे.

आ. ‘मला गर्भधारणा झाली आहे’, हे समजल्यावर मी नियमित स्तोत्रे म्हणू लागले.’

– सौ. अर्चना सचिन कटके (चि. रुद्रची आई), पुणे

इ. ‘सौ. अर्चनाताईच्या गर्भारपणात आम्हा सर्व कुटुंबियांमध्ये संघटितपणा वाढला होता. ताई प्रत्येक कृती भावपूर्ण करत होती. त्यामुळे कुटुंबियांना आनंद अनुभवता आला.’

– श्री. शशांक सोनवणे (चि. रुद्रचा मामा), पुणे

२. जन्म ते सहा मास

सौ. अर्चना सचिन कटके

२ अ.  ‘चि. रुद्र जन्मापासूनच ब्राह्ममुहूर्तावर झोपेतून जागा होतो.

२ आ. शांत आणि सात्त्विक

१. पू. (सौ.) मनीषा पाठक (सनातनच्या १२३ व्या (समष्टी) संत) यांनी बाळाला पाहून सांगितले, ‘‘बाळ शांत आणि सात्त्विक आहे.’’

२. रुद्रने आतापर्यंत कोणत्याही प्रकारे त्रास दिला नाही. ‘तो बाहेर गेल्यानंतरही शांत असतो’, असे माझ्या लक्षात आले.

२ इ. ‘हनुमान चालिसा आणि हनुमान अष्टक’ मनापासून ऐकणे : आम्ही प्रतिदिन सकाळी भ्रमणभाषवर ‘हनुमान चालिसा आणि हनुमान अष्टक’ लावत होतो. बाळ ते मन लावून ऐकत असे.’

– सौ. अर्चना सचिन कटके

२ ई. त्याच्या देहावर पुष्कळ दैवी कण आढळत असत.’

–  सौ. राधा अशोक सोनवणे (चि. रुद्रची आजी, आईची आई), सिंहगड रस्ता, पुणे

२ उ. स्थिर

१. ‘रुद्र कुठल्याही प्रकारचा त्रास देत नसे. त्याच्या छातीवर हात ठेवून नामजप करत असतांना तो स्थिर रहात असे.

२. तो सहजतेने सर्वांकडे जातो. तो क्वचित्च रडत असे.

३. एकदा पू. (सौ.) मनीषा पाठक घरी आल्या होत्या. तेव्हा त्यांनी रुद्रला घेतल्यावर तो शांतपणे त्यांच्याकडे पहात होता.’

– श्री. शशांक सोनवणे

३. वय ६ मास ते १ वर्ष

सौ. राधा अशोक सोनवणे

३ अ. देवाची आवड

१. ‘रुद्र ‘श्री गणपति अथर्वशीर्ष’ आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप ऐकत झोपतो.

२. एकदा मी स्वयंपाक करत असतांना रुद्र रडत होता. त्याचे रडणे काही केल्या थांबत नव्हते. तेव्हा मी भ्रमणभाषवर ‘हनुमानचालिसा’ लावली. तेव्हा रुद्र एकदम शांत झाला.

३. एकदा मध्यरात्री २.३० वाजता रुद्र अतिशय मोठ्याने रडू लागला. मला आणि यजमानांना ‘काय करावे ?’, ते लक्षात येत नव्हते. त्या वेळी आम्ही भ्रमणभाषवर ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप लावल्यावर काही क्षणांतच तो एकदम शांत होऊन झोपला.

४. रुद्र ९ मासांचा असतांना ‘विठ्ठल, विठ्ठल’ असे अस्पष्टपणे म्हणत असे.

५. प.पू. भक्तराज महाराज यांचे ‘सोनियाच्या शिंपल्यात’ हे भजन त्याला अतिशय आवडते. ते भजन म्हणत असतांना तो हसतो आणि शांतपणे भजन ऐकतो.

४. रुद्रमधील स्वभावदोष : हट्टीपणा’

‘रुद्रकडून आणि माझ्याकडून देवाला अपेक्षित असे साधनेचे प्रयत्न सतत होऊ देत’, अशी मी देवाच्या चरणी प्रार्थना करते.’

– सौ. अर्चना सचिन कटके

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : ११.११.२०२४)

यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक