दवर्ली, मडगाव (गोवा) येथील मुसलमान व्यक्तीकडून सामाजिक माध्यमातून पाकिस्तानच्या समर्थनार्थ ‘पोस्ट’ प्रसारित !

हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी पाकधार्जिण्या युवकाला केले पोलिसांच्या स्वाधीन !

(प्रतिकात्मक चित्र)

मडगाव, १२ सप्टेंबर (वार्ता.) – दवर्ली हाऊसिंग बोर्ड येथील रहिवासी शैफुल्ला दोड्डामनी याने ‘इन्स्टाग्राम’वर ‘पाकिस्तान झिंदाबाद’ अशी ‘पोस्ट’ प्रसारित केली. याविषयी माहिती मिळाल्यानंतर विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या एका गटाने संबंधित युवकाला ११ सप्टेंबरच्या रात्री मडगाव पोलिसांच्या स्वाधीन केले. यानंतर विश्व हिंदु परिषदेचे भगवान रेडकर यांनी मडगाव पोलीस ठाण्यात या घटनेची रितसर तक्रार प्रविष्ट करून संबंधितावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे, तसेच या घटनेची पुनरावृत्ती टाळावी, असे आवाहनही तक्रारीत करण्यात आले आहे.

या घटनेविषयी अधिक माहिती देतांना विराज देसाई म्हणाले, ‘‘पाकिस्तानच्या समर्थनार्थ ‘पोस्ट’ प्रसारित झाल्याचे लक्षात आल्यावर विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या एका गटाने संबंधित युवकाला शोधून काढून त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेच्या मागे कोणती संघटना आहे का ? याचा पोलिसांनी शोध घेतला पाहिजे.’’