शिवसैनिकांनी मुंबई-गोवा महामार्ग २ घंटे रोखला

अलिबाग – रायगडचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांना देण्यात आले. या प्रकरणी संतप्त शिवसैनिकांनी मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक २ घंटे रोखून धरली होती. पालकमंत्रीपदासाठी शिवसेनेचे भरत गोगावले यांना डावलण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. या वेळी त्यांनी रस्त्यावर टायर जाळून याचा निषेध केला. गोगावले यांचा जयजयकार करत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांचा निषेध करण्यात आला. पोलिसांनी हस्तक्षेप करत शिवसैनिकांना बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.