योगी आदित्यनाथ यांचे समर्थन केल्यावरून मुसलमान महिलेला पतीकडून तलाकची नोटीस

महिलेच्या तक्रारीनंतर पतीला अटक

प्रतीकात्मक छायाचित्र

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) – येथील सना इरम या मुसलमान महिलेने राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे समर्थन केल्याने आणि भाजपला मतदान केल्याने तिच्या पतीने तिला तलाकसाठी नोटीस पाठवली आहे. यानंतर या महिलेनेही पती आणि सासरचे लोक यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली. यानंतर पोलिसांनी पती नदीम याला अटक केली.

सना इरम यांनी ट्वीट करून तिला तलाकची नोटीस आल्याची माहिती योगी आदित्यनाथ यांना दिल्यानंतर देहलीतील एका हिंदुत्वनिष्ठ संघटनेच्या अध्यक्षाने मुरादाबाद येथील पोलीस अधिकार्‍यांना दूरभाष करून या महिलेला न्याय देण्याची विनंती केली होती.

संपादकीय भूमिका

अशा प्रसंगात महिला आयोग आणि महिला संघटना मुसलमान महिलांसाठी कधी आवाज उठवतात का ?