अलीगड, जामिया मिल्लिया इस्लामिमया आणि हमदर्द या ३ विश्‍वविद्यालयांमधून जिहादी शिक्षण दिले जात आहे !

देशातील २५ विचारवंतांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून कारवाईची मागणी !

नवी देहली – देशातील २५ विचारवंतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून ३ विश्‍वविद्यालयांमध्ये जिहादी शिक्षण दिले जात असल्याचा आरोप केला आहे.  अलीगड मुस्लिम विश्‍वविद्यालय, जामिया मिल्लिया इस्लामिया विश्‍वविद्यालय आणि हमदर्द विश्‍वविद्यालय अशी त्यांची नावे आहेत. यासह त्यांनी या विश्‍वविद्यालयांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे.


या पत्रामध्ये म्हटले आहे की, या विश्‍वविद्यालयांतील काही विभागांमध्ये जिहादी शिक्षण दिले जात आहे. त्या माध्यमातून हिंदु समाज आणि संस्कृती यांवर आक्रमण केले जात आहे. हा चिंतेचा विषय आहे. प्रमुख इस्लामी विश्‍वविद्यालयांमध्ये अशा विचारसरणीला सम्मान देण्याचा प्रयत्न होत आहे. विशेष म्हणजे देशाच्या फाळणीनंतर आता काही प्रमुख मुसलमान नेत्यांकडून वर्ष २०४७ पर्यंत देशाचे इस्लामीकरण करण्याचा संकल्प केला जात आहे. ही विश्‍वविद्यालये जनतेच्या करातून चालवली जात आहेत. अशांवर कारवाई करण्याची मागणी करण्याचा आम्हाला अधिकार आहे. त्यामुळे यावर लक्ष देऊन कारवाई करावी.

संपादकीय भूमिका

जे विचारवंतांच्या लक्षात येते, ते गुप्तचरांच्या आणि शिक्षण विभागाच्या कसे लक्षात येत नाही ?