गुरुचरणांशी सदा ही एकच आस ।

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
पू. संदीप आळशी

‘नको तो लोभ आध्यात्मिक पातळीचा ।
नको तो लोभ सेवेच्या दायित्वाचा ।
असो लोभ सदा गुरुचरणांचा ।
श्री चरणी जीवन समर्पिण्याचा ।। १ ।।

पातळी न स्थिर राही जन्मोजन्मी ।
दायित्व न मिळे सदासर्वकाळी ।
गुरुचरणांचे स्मरण रहाता अंतःकाळी ।
गुरुकृपेची निश्चिती जन्मोजन्मी ।। २ ।।

पातळीविषयी वाढावा साक्षीभाव ।
गुरुचरणांप्रती दृढ व्हावा कृतज्ञताभाव ।
गुरुसेवा, गुरुभक्ती यांचा लागो ध्यास ।
गुरुचरणांशी सदा ही एकच आस ।। ३ ।।’

– (पू.) संदीप आळशी (८.७.२०२२)