सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी घेतली काशी पिठाधीश्वरांची भेट !

सोलापूर येथील काशी पीठाचे पिठाधीश्वर डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी आणि सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

सोलापूर – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी २६ जून या दिवशी सोलापूर येथील काशी पीठाचे पिठाधीश्वर डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांची भेट घेतली. या वेळी दोघांनी देशातील विविध धार्मिक आणि आध्यात्मिक प्रश्नांवर चर्चा केली. यानंतर सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी ‘हरिभाई देवकरण प्रशाले’त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांशी संवाद साधला. वर्ष २०२५ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण होत आहेत. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांना ‘झेड प्लस’ सुरक्षा असल्याने पोलिसांनी शहरात मोठा बंदोबस्त ठेवला होता.