समान नागरी कायदा सहन केला जाणार नाही ! – जमीयत उलेमा ए-हिंदचा थयथयाट

आम्हाला ‘पाकिस्तानात जा’ म्हणणार्‍यांनीच तेथे जावे ! – मौलाना मदनी

डावीकडे मौलाना मदनी

देवबंद (उत्तरप्रदेश) – मी गरळओक करतो, असे मला सांगितले जाते. मला प्रश्‍न विचारले जातात; मात्र जे गरळओक करत आहेत, त्यांच्याविषयी कुणीच काही बोलत नाही. आमचे अस्तित्व नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या देशात आम्ही (मुसलमान) सर्वांत मोठी लोकसंख्या आहोत. या देशाच्या सुरक्षेसाठी आम्ही पुढाकार घेऊ. कुणाला आमचा धर्म सहन होत नाही, तर त्यांनी दुसरीकडे निघून जावे. आम्हाला पाकमध्ये जाण्याची संधी मिळाली होती; मात्र आम्ही गेलो नाही. लहान लहान गोष्टींवरून आम्हाला ‘पाकिस्तानात जा’ म्हणणार्‍यांनी स्वतः पाकिस्तान जावे, असे फुकाचे विधान जमीयत उलेमा-ए-हिंदचे अध्यक्ष मौलना (इस्लामचे धार्मिक नेते) महमूद मदनी यांनी येथे केले. जमीयत उलेमा-ए-हिंदच्या अधिवेशनाच्या दुसर्‍या दिवशी ते बोलत होते. या वेळी समान नागरी कायद्याच्या विरोधात ठराव सादर करण्यात आला. तसेच ‘मुस्लिम पर्सनल लॉ’मध्ये कोणताही पालट स्वीकारला जाणार नाही, याचा विरोध केला जाईल. शरीयतमध्ये हस्तक्षेप स्वीकारला जाणार नाही, असेही सांगण्यात आले.

१. समान नागरी कायद्याविषयी आम्हीही सूत्रे सिद्ध केली आहेत. कोणताही कायदा बनवला, तरी मुसलमानांनी शरीयतनुसार चालवण्याचे ठरवले, तर कोणताही कायदा त्यांना रोखू शकणार नाही, अशी चेतावणीही त्यांनी दिली. (भारतीय न्याययंत्रणेला समांतर न्याययंत्रणा आणण्याचा प्रयत्न करणार्‍यांवर सरकारने कारवाई करावी ! – संपादक)

२. मौलाना मदनी पुढे म्हणाले की, प्रत्येक गोष्टीमध्ये तडजोड होऊ शकते; मात्र धोरणांवर तडजोड होऊ शकत नाही. आम्हाला जे आदर्श मिळाले आहेत, त्यावर तडजोड होऊ शकत नाही. आम्ही देशाच्या एकतेविषयी बोलतो, तेव्हा ते आमचे कर्तव्य असतेे. जर देशाच्या सुरक्षेसाठी आमचे रक्त सांडत असेल, तर आम्हाला आनंदच आहे. (देशासाठी रक्त सांडणार्‍या मुसलमानांची संख्या अत्यल्प आहे. याउलट देश तोडण्याची भाषा करणार्‍यांची, समाजात विष कालवण्याची आणि हिंदूंच्या जिवावर उठणार्‍यांची संख्या अधिक का आहे, हेही मदनी यांनी सांगावे ! – संपादक)

३. मौलाना मदनी म्हणाले की, तुम्ही तुमच्याच लोकांना घाबरवणे बंद करा आणि ज्या लोकांना तुम्ही तुमचे समजत नाहीत त्यांनाही घाबरवणे बंद करावा. आम्ही कुणी वेगळे नाही. हा देश आमचा आहे. या देशासाठी आमचे जे दायित्व आहे, ते आम्हाला ठाऊक आहे. ते आम्ही पार पाडू. त्यासाठी कोणतीही तडजोड करणार नाही. आमचा धर्म वेगळा आहे, पोषाख वेगळा आहे. जर हे तुम्हाला मान्य नाही, तर तुम्ही दुसरीकडे निघून जा. (ही भूमी हिंदूंची आहे. येथे पुरातन काळापासून हिंदु संस्कृती आणि परंपरा यांचे पालन केले जात आहे. असे असतांना धर्मांधतेपायी विशिष्ट पोशाख सार्वजनिक ठिकाणी परिधान करून स्वतःचे वेगळे अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करणार्‍यांची ही उद्दाम भाषा जाणा ! – संपादक)

४. जमीयत उलेमा-ए-हिंदकडून म्हटले गेले की, ज्ञानवापी मशीद, मथुरेतील ईदगाह मशीद आणि अन्य मशिदी यांच्याविरोधात अभियान राबवले जात आहे. यामुळे देशातील शांतता आणि अखंडता यांना हानी पोचत आहे. आम्ही सत्तेत बसणार्‍या लोकांना सांगू इच्छितो की, इतिहासातील मतभेदांना सतत जिवंत करणे देशातील शांतता आणि सद्भाव यांसाठी योग्य नाही. (जे हिंदूंचे आहे, ते हिंदू पुन्हा मिळवण्याचा न्यायालयीन लढा देत आहेत. हिंदू नव्हे, तर ज्यांनी हिंदूंची मंदिरे तोडून मशिदी बांधल्या आहेत, तेच येथील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत ! – संपादक)

संपादकीय भूमिका 

  • भारताच्या संसदेने समान नागरी कायदा संमत केला, तर देशातील प्रत्येक नागरिकाला तो पाळणे बंधनकारक असणार आहे. त्याला कुणी विरोध केला, तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे सरकारने ठणकावून सांगितले पाहिजे !
  • धर्मनिरपेक्ष देशात धर्माच्या आधारे सोयीसुविधा घेणे हा धर्मनिरपेक्षतेचा अवमान आहे आणि गेले ७४ वर्षे तो केला जात आहे. आता तो थांबणेच योग्य आहे. जर कुणी त्याला विरोध करत असेल, तर सरकारने तो मोडूनही काढला पाहिजे !