उगवला दिन हा आपल्या वाढदिवसाचा ।

सर्व साधकांवर कृपादृष्टी असणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले

उगवले पर्व आज आपल्या (टीप १) वाढदिवसाचे ।
गुरुमाऊली आपल्या चरणी वंदन असो ।
प्रार्थितो आम्ही देण्या आशीर्वाद आपल्या चरणांस ।
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचा आमच्या मनी असो ध्यास ।। १ ।।

श्री. कृष्णकुमार जामदार

उगवला दिन हा आपल्या वाढदिवसाचा ।
गुरुमाऊली वंदुनी आम्ही सारे आपल्या चरणी ।
अभिष्ट चिंतितो आपल्या चरणी ।
होऊनी कृपावंत आम्हा वर द्यावा आपण ।। २ ।।

आशीर्वाद एक द्यावा ।
आपल्या सेवेत असतांना मिळावे हिंदु राष्ट्र पहाण्या ।
हे मनोवांच्छित व्यक्त करतो ।
उगवला दिन आज आपल्या वाढदिवसाचा ।। ३ ।।

गुरुमाऊली आपुल्या चरणी वंदन असो ।
चिंततो दीर्घायुष्य तुम्हास ।
मिळो पहाण्या हिंदु राष्ट्राची पहाट ।
पूर्ण करावी आमची ही इच्छा आपण ।। ४ ।।

टीप १ : परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या

– श्री. कृष्णकुमार जामदार, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२.५.२०२१)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक