‘हिजाब’ बंदीच्या निमित्ताने…
कर्नाटक उच्च न्यायालयाने शालेय विद्यार्थिनींसाठी हिजाब (मुसलमान महिलांनी डोके आणि मान झाकण्यासाठी वापरलेले वस्त्र) घालून शाळेत किंवा परीक्षेला जाण्यास बंदी केली आहे; परंतु अद्यापही काही ठिकाणी हिजाबच्या अनुमतीसाठी आंदोलने चालू आहेत. हिजाब घातलेल्या काही विद्यार्थिनींनी परीक्षेला बसण्यास नकार दिला आहे. खरोखर ‘हिजाबची सक्ती कुणाला हवी आहे ?’, या प्रश्नाचा उलगडा करण्यासाठी एक अनुभव लिहित आहे.
१. रेल्वेतील ३ हिजाबी कन्यांशी संवाद !
‘साधारणतः वर्ष २०१७ ची ही गोष्ट आहे. मी भाग्यनगर (हैद्राबाद) येथे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने गोव्याहून रेल्वेने निघालो. या प्रवासाच्या अंतर्गत हुब्बळ्ळी (कर्नाटक) या रेल्वेस्थानकावर ३ मुसलमान विद्यार्थिनी आणि त्यांचे अब्बाजान (कदाचित् आजोबा असावेत.) आमच्या रेल्वेत चढले. माझ्या अवतीभवतीच्या जागा या चौघांच्या असल्याने माझी त्यांच्याशी ओळख झाली आणि त्यांच्याशी संवाद झाला.
या ३ कन्या ११ व्या इयत्तेत शिकत होत्या आणि भाग्यनगर येथे कुठल्या तरी एका परीक्षेसाठी जात होत्या. त्यांचे पालक म्हणून त्यांच्यासमवेत या कन्यांपैकी एकीचे नातेवाईक आले होते. या मुली त्यांना ‘अब्बाजान’ म्हणत होत्या. काळ्या रंगाचे हिजाब घातलेल्या या तीन कन्या बोलक्या होत्या. त्यांच्यातील एकीने संपूर्ण वेशभूषा बुरख्याची केली होती; परंतु तोंडवळा मात्र मोकळा होता. मी त्यांना कुतुहलाने विचारले ‘हिजाब म्हणजे काय ?’ आणि ‘बुरखा म्हणजे काय ?’ त्यांच्यापैकी एकीचे वडील मशिदीमध्ये मौलाना (इस्लामी विद्वान) असल्याने तिने विस्तृतपणे या संदर्भातील इस्लाममधील माहिती सांगितली.
मी विचारले की, ‘तुला हे सगळे कसे ठाऊक ?’ तेव्हा तिने तिचे वडील मौलाना असून त्यांनीच हे शिकवल्याचे सांगितले.
२. हिजाब आणि घुंघट यांवरील ‘गरम’ चर्चा !
२ अ. हिंदु धर्मात जसा घुंघट, तसा इस्लाममध्ये हिजाब’, असे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न ! : मी म्हटले, ‘‘उन्हाळ्याचे दिवस आहेत. मे मास हा अत्यंत गरमीचा काळ असतांना काळ्या रंगाचा स्कार्फ (हिजाब) घालून तुम्हाला गरम (उष्ण) होत नाही का ?’’ त्या वेळी तिघींनी सांगितले की, ‘यह हमारे मजहब का फैसला है ! इसीलिए हिजाब को हमने अपनाया है ।’’ (हा आमच्या धर्माने दिलेला निर्णय आहे. त्यामुळे आम्ही हिजाब अंगीकारला आहे.) त्यांच्यापैकी एकीने पुढे सांगितले, ‘‘आपके धरम में भी तो घुंघट डालते है । वैसाही यह हिजाब है ।’’ (तुमच्या धर्मातील स्त्रिया घुंघट घेतात. तसाच आमचा हिजाब आहे.) थोडक्यात ‘तुमच्या आणि आमच्या धर्मातील शिकवण एकच आहे’, हे सांगण्याचा तिचा केविलवाणा प्रयत्न होता !
२ आ. घुंघट प्रथा सुलतानी आक्रमकांमुळे आल्याचे सांगितल्यावर धर्मांध मुलीला राग येणे : मी त्यांना ‘घुंघट प्रथा भारतात कशी आली ?’, हे थोड्या विस्ताराने सांगतांना सुलतानी आक्रमकांनी हिंदु कन्यांवर केलेल्या अत्याचारांचे वर्णन केले. त्यांना मी ‘‘घुंघट प्रथा ही दहशतीमुळे आली. ती हिंदु धर्मात कधीच नव्हती. आमच्या सर्व देवी माता कधी घुंघट घालत नाहीत’’, हे सोप्या शब्दांत सांगितले. मी असे बोलल्याने त्यांतील एकीला राग आला आणि ती जरा रागावूनच म्हणाली, ‘‘आपने झुठी कहानी बतायी । यह देश पहले मुसलमानोंका ही था । गांधी और नेहरूने हमारे लोगों को पाकिस्तान में भेज दिया ।’’ (तुम्ही खोटी कथा सांगितली. हा देश प्रथम मुसलमानांचाच होता. गांधी आणि नेहरू यांनी आमच्या लोकांना पाकिस्तानात पाठवले.) त्यांची ही वाक्ये विद्यार्थीदशेतील मुसलमानांच्या मनाचा शोध घेण्यासाठी पुरेशी होती !
३. ‘हिजाब’ कुणाला हवा होता ?
३ अ. हिजाब घालण्याविषयी काहींना घरातून सक्ती असणे, तर काहींनी तो स्वतःहून परिधान करणे : अन्य दोघी आणि त्यांचे अब्बाजान मात्र कुतुहलाने संवाद ऐकत होते. मी त्यांना म्हणालो, ‘‘बर्याचदा आपल्याला कळलेली माहिती खरीच असते, असे नाही. त्यामुळे याचा विचार करू नका; पण तरीही मला असे वाटते की, तुमचे अब्बाजान सोबत आहेत; म्हणून तुम्ही एवढ्या उन्हात हा काळा स्कार्फ घातला असावा.’’ मी असे म्हणताच त्यांच्यातील एक मुलगी लाजली. तेवढ्यात त्यांचे अब्बाजान चर्चेत सहभागी होत म्हणाले, ‘‘मैंने कोई मजबुरी नहीं की है । यह तो उनका खुदका फैसला है ।’’ (मी काही बळजोरी केलेली नाही. तो त्यांचा स्वतःचा निर्णय आहे.) दुसर्या मुलीनेही जरा ठासूनच सांगितले, ‘‘यह हमारा खुदका फैसला है ।’’(हा आमचा स्वतःचा निर्णय आहे.) तिसर्या मुलीने मात्र प्रांजळपणे सांगितले, ‘‘मुझे मेरे अब्बा ने बताया है । ९ वी कक्षा तक हम नहीं पहनते थे ।’’ (माझ्या बाबांनी मला हिजाब घालण्यास सांगितले. ९ व्या इयत्तेपर्यंत मी तो घालत नव्हते.)
३ आ. संधी मिळताच तिन्ही मुली शृंगार साहित्य खरेदी करण्यास बाहेर जाणे ! : काही वेळाने गुंटकल नावाचे रेल्वेस्थानक आले. येथे ५ घंट्यांचा थांबा होता; कारण आमची मुख्य गाडी बेंगळुरूला जाणार होती आणि आमचे भाग्यनगरचे डबे दुसर्या रेल्वेला जोडले जाणार होते. गुंटकल स्थानकाला गाडी थांबल्यानंतर ते अब्बाजान उठले आणि या ३ कन्यांना म्हणाले, ‘‘मेरे पुराने रिश्तेदार यहां रहते हैं । मैं ३ घंटों में वापस आऊंगा । तब तक अपना ख्याल रखना ।’’ (येथे माझे काही जुने नातेवाइक रहातात. मी ३ घंट्यांत परत येईन.) ते गाडीतून उतरल्याची निश्चिती होताच या तिन्ही ‘हिजाबी’ कन्या आपापल्या जागेवरून उठल्या आणि मला म्हणाल्या, ‘‘भैय्या, हम २ घंटों में बाजार होकर आते हैं । अब्बाजान आने से पहले ही आ जाएंगे ॥’’ (दादा, आम्ही २ घंट्यांत येथील बाजारात जाऊन येतो. अब्बाजान येण्याच्या आधीच आम्ही पोचू.)
३ इ. इस्लाममध्ये अवैध असतांनाही मुलींनी शृंगार साहित्य खरेदी करणे आणि त्याविषयी वडीलधार्यांना न सांगण्याच्या विनंतीवरून ‘हिजाब कुणाला हवा ?’, या प्रश्नाचे उत्तर मिळणे : गुंटकल हे नगर अलंकार आणि सौंदर्यप्रसाधने यांसाठी प्रसिद्ध आहे. साधारणतः २ घंट्यांनी या मुली पुन्हा रेल्वेत चढल्या. त्यांनी कर्णफुले, गळ्यातील माळा, काळ्या बिंदी, क्लिप आणि छोटे छोटे आरसे खरेदी केले होते. रेल्वेत चढल्यानंतर त्या तिघींनी ‘हिजाबी’ स्कार्फ काढून बाजूला ठेवले आणि ते अलंकार परिधान केले. त्या आरशांत पहात होत्या. त्या वेळी मी त्यांना हसत हसत विचारले, ‘‘गुंटकल में यह शृंगारसाहित्य सस्ता मिलता है क्या ? (गुंटकल येथे शृंगारसाहित्य स्वस्त मिळते का ?) तिघी एकसुरात म्हणाल्या, ‘‘बहुत सस्ता है भैय्या ।’’ (पुष्कळ स्वस्त मिळते.) मी लगेच म्हटले, ‘‘पर इस्लाम में शृंगार जायझ है क्या ?’’ (पण इस्लाममध्ये शृंगार वैध आहे का ?) माझा हा प्रश्न ऐकताच तिन्ही कन्या एकमेंकींकडे पाहून वरमल्या. त्यांच्यातील एकीने ‘नाही’ म्हणण्याचे धाडस दाखवताच दुसरी म्हणाली, ‘‘भैय्या हमने यह साहित्य खरीदा है, ऐसे आप अब्बाजान को ना बताए !’’ (दादा, आम्ही हे साहित्य खरेदी केलेले आहे, ते तुम्ही अब्बाजान यांना सांगू नका !) मी होकारार्थी मान डोलावली; कारण त्यांच्या विनंतीवरून ‘हिजाब कुणाला हवा होता ?’, या प्रश्नाचे उत्तर मला मिळाले होते.
शृंगार हे स्त्रीचे नैसर्गिक कर्म आहे; परंतु ते नाकारून काळ्या स्कार्फमध्ये तिला गुंडाळणार्या प्रवृत्तीविषयी खरेतर स्त्रीमुक्ती चळवळ असायला हवी; पण हे आधुनिक स्त्रीमुक्तीवाल्यांना कोण सांगणार ?’
– श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था.