उत्तरप्रदेशातील मदरशांमध्ये आता ‘राष्ट्रगीत’ बंधनकारक असणार !

देशातील प्रत्येक मदरशांमध्ये हे बंधनकारक केले पाहिजे ! आतापर्यंत ते का करण्यात आले नाही, याचे उत्तरही राष्ट्राभिमान्यांना मिळाले पाहिजे ! – संपादक

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेश राज्यातील मान्यताप्राप्त अनुदानित आणि विनाअनुदानित मदरशांतील विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक सत्रापासून वर्ग प्रारंभ होण्यापूर्वी राष्ट्रगीत म्हणणे बंधनकारक असणार आहे. तसेच आठवीपर्यंतच्या परीक्षेत विज्ञान, इंग्रजी आणि गणित यांच्या प्रश्‍नांचाही समावेश केला जाणार आहे. मदरसा शिक्षक पात्रता परीक्षादेखील चालू करण्यात येणार आहे.