असे आदर्श न्यायाधीश देशात सर्वत्र हवेत !

‘कर्णावती (गुजरात) येथे २६ जुलै २००८ या दिवशी झालेल्या बाँबस्फोट मालिकांच्या प्रकरणाच्या संदर्भात निकाल देतांना विशेष न्यायालयाचे विशेष न्यायाधीश ए.आर्. पटेल यांनी म्हटले, ‘प्रकरणातील ३८ दोषी हे फाशीच्या शिक्षेस पात्र आहेत; कारण अशा दोषींना समाजात राहू देणे; म्हणजे नरभक्षक वाघाला उघड्यावर सोडण्यासारखे आहे. हे आतंकवादी कोणताच विचार न करता लहान मुले, युवक अथवा वयस्कर अशा निर्दाेष लोकांना ठार करतात. दोषींनी अशांती निर्माण करून राष्ट्रविरोधी कारवाया घडवून आणल्या. अशांना घटनात्मक पद्धतीने निवडून आलेल्या केंद्र आणि गुजरात सरकार यांच्याप्रती कोणताच आदर नसून यांच्यापैकी काही जण सरकार अन् न्याययंत्रणा यांच्यापेक्षा केवळ अल्लावर विश्वास ठेवतात.’