६ डिसेंबर २०२१ या दिवशी निरागसता, प्रीती आणि उत्कट राष्ट्र अन् धर्म प्रेम असणारे फोंडा, गोवा येथील सनातनचे ८० वर्षीय साधक श्री. लक्ष्मण गोरे सनातनच्या ११४ व्या व्यष्टी संतपदी विराजमान झाले. त्यांच्या सन्मानसोहळ्याचे वृत्त, परात्पर गुरु डॉ. आठवले, आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी पू. लक्ष्मण गोरे यांच्याविषयी काढलेले गौरवोद्गार, तसेच कुटुंबियांनी पू. लक्ष्मण गोरे यांची सांगितलेली गुणवैशिष्ट्ये आदी सूत्रे १४ डिसेंबर २०२१ या दिवशी पाहिली. आज सद्गुरु, संत आणि साधक यांनी त्यांची सांगितलेली गुणवैशिष्ट्ये प्रसिद्ध करत आहोत.
पू. लक्ष्मण गोरे यांची १४ डिसेंबर २०२१ या दिवशी सांगितलेली गुणवैशिष्ट्ये आदी सूत्रे वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/535085.html
सद्गुरु आणि संत यांनी व्यक्त केलेले भावपूर्ण मनोगत
सोहळ्याच्या ठिकाणी आनंद, चैतन्य आणि भाव यांची स्पंदने जाणवत होती ! – सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ
‘सोहळ्याच्या ठिकाणी मला ४० टक्के आनंदाची स्पंदने जाणवत होती. यासमवेतच चैतन्य आणि भाव यांची स्पंदनेही जाणवली. पू. गोरेआजोबा यांचे छायाचित्र असलेल्या लखोट्याकडे पाहिल्यानंतर सगळ्याचा विसर पडून केवळ छायाचित्रच दिसत होते. तेव्हा आनंद आणि भाव यांची स्थिती अनुभवली. पू. गोरेकाकांमध्ये आधीपासूनच पुष्कळ नम्रता आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रत्यक्ष भेट घेतलेले पू. गोरेकाका हे सनातनचे एकमेव संत ! – पू. नीलेश सिंगबाळ
‘कार्यक्रमस्थळी आनंदाची स्पंदने जाणवत होती. पू. गोरेकाका हे सनातनचे एकमेव संत आहेत, ज्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रत्यक्ष भेट घेतली आहे. पू. काकांमध्ये ज्ञानशक्ती जाणवते. त्यांची बोलण्याची शैलीही मार्मिक आहे. मी जेव्हा देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात जायचो, तेव्हा मला काका भेटत असत. आज त्यांना बर्याच वर्षांनी भेटत आहे. ‘नम्रता हा त्यांचा स्थायीभाव आहे’, असे जाणवते.’
पू. गोरेआजोबा यांचे राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे बोलणे ऐकून त्यांची माझ्यावर छाप पडली ! – पू. सदाशिव परांजपे
‘पू. गोरेआजोबांच्या चरणी शिरसाष्टांग नमस्कार ! काही दिवसांपूर्वी पू. गोरेआजोबांच्या घरी त्यांना भेटण्यासाठी गेलो असतांना त्यांच्या आयुष्यात घडलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भेटीविषयी त्यांनी मला माहिती दिली होती. राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भात त्यांनी मांडलेला विषय ऐकून पहिल्याच भेटीत त्यांची माझ्यावर छाप पडली.’
‘पू. गोरेआजोबा यांची आंतरिक साधना चालू असून ते लवकर संत होतील’, असे वाटत होते ! – पू. (सौ.) शैलजा परांजपे
‘आम्ही मध्यंतरी पू. गोरेआजोबा यांच्या घरी गेलो होतो. पू. आजोबा यांच्याशी माझी तशी ओळख नाही; परंतु त्यांना पाहून ‘त्यांची आंतरिक साधना चालू असून त्यांचा नामजप सतत चालू आहे’, असे जाणवले होते. ‘ते लवकरच संत होतील’, असेही वाटले होते.’ आज आम्हाला सत्संगासाठी आश्रमात येण्याचा निरोप मिळाल्यावर ‘सत्संगात पू. गोरेआजोबा यांचे संतपद घोषित करतील.’, असे मला वाटले होते.’
उपस्थित साधकांना पू. गोरेआजोबा यांच्याविषयी लक्षात आलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे
पू. गोरेआजोबा ऋषिमुनी असून त्यांचा आतून ‘विठ्ठल विठ्ठल’ नामजप चालू आहे, असे जाणवले ! – कु. अपाला औंधकर (वय १४ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
‘पू. आजोबा यांचे डोळेच सर्व काही सांगतात’, असे वाटते. त्यांच्यात भाव आणि प्रीती प्रचंड प्रमाणात असल्याचे जाणवते. ‘ते ऋषिमुनी असून त्यांचा आतून ‘विठ्ठल विठ्ठल’ नामजप चालू आहे’, असे जाणवले.
शांत, प्रेमळ आणि मनमिळाऊ पू. आजोबा आम्हाला लाभले, यासाठी मी गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञ आहे ! – कु. ऐश्वर्या जोशी (वय १८ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), सनातन आश्रम, मिरज.
पू. गोरेआजोबा यांना पाहून आनंदच जाणवतो. देवद, पनवेल येथील सनातनच्या आश्रमात असल्यापासून मला त्यांचा सहवास अनुभवायला मिळाला आहे. शांत, प्रेमळ आणि मनमिळाऊ पू. आजोबा आम्हाला लाभले, यासाठी मी परात्पर गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञ आहे.’
पू. गोरेआजोबा यांच्यामध्ये प्रीती आणि भाव असल्याचे जाणवते ! – कु. वैदेही सावंत (वय ११ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
‘संत-सन्मान सोहळ्याच्या वेळी बाहेरील वातावरण गुलाबी आणि निळे झाल्याचे मला जाणवले. यातून पू. आजोबा यांच्यामध्ये प्रीती आणि भाव असल्याचे माझ्या लक्षात आले.’ ‘पू. आजोबांमध्ये साक्षीभाव आणि विरक्ती आहे’, असे जाणवते. – वैद्या (कु.) शर्वरी बाकरे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
‘पू. गोरेआजोबा यांना मी सोहळ्याच्या आधी प्रथमच पाहिले. तेव्हा ‘ते संतच आहेत’ असे मला वाटत होते. – श्री. ज्ञानदीप चोरमले, सोलापूर
पू. गोरेआजोबा ६ डिसेंबर या दिवशी संतपदी विराजमान होणे, यामागील दैवी नियोजन !
|
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या आणि संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |