क्रियमाण कर्माचे महत्त्व !

पू. तनुजा ठाकूर यांचे मौलिक विचार

पू. तनुजा ठाकूर

‘पापं प्रज्ञां नाशयति क्रियमाणं पुनः पुनः ।

– विदुरनीति, अध्याय ३, श्लोक ६१

अर्थ : सतत केलेले पापकर्म बुद्धीचा विनाश करते.

नष्टप्रज्ञ: पापमेव नित्यमारभते नरः ।
पुण्यं प्रज्ञां वर्धयति क्रियमाणं पुन: पुन:।।

– विदुरनीति, अध्याय ३, श्लोक ६२

अर्थ : सद्बुद्धी नष्ट झालेला मनुष्य सदैव पापकर्म करत रहातो. निरंतर केले जाणारे पुण्यकर्म (सात्त्विक) बुद्धी वाढवते.

वृद्धप्रज्ञ: पुण्यमेव नित्यमारभते नर: ।

– विदुरनीति, अध्याय ३, श्लोक ६३

अर्थ : असा (सात्त्विक बुद्धीचा) मनुष्य सदैव पुण्य कर्मच करतो.

हा नीती श्लोक वाचून सर्वांनी ‘क्रियमाणातून शक्यतो पापकर्म होऊ नये आणि विवेक जागृत रहावा’, यासाठी सदैव प्रयत्नशील असले पाहिजे. जेव्हा बुद्धी योग्य आणि अयोग्य, धर्म आणि अधर्म, पाप आणि पुण्य यांचे विश्लेषण करण्यास सक्षम होईल अन् व्यक्ती योग्य वर्तन करू लागेल, तेव्हा समजून घ्या की, त्या व्यक्तीचा विवेक जागृत आहे. मनुष्य आणि प्राणी यांच्यात मुख्य भेद हा आहे की, मनुष्य आपल्या विवेकबुद्धीचा वापर करून स्वतःच्या जीवनाचे परम कल्याण करू शकतो.

प्रारब्ध आणि क्रियमाण कर्म यात भेद एवढाच आहे की, जिथे प्रारब्ध कर्मावर आपले नियंत्रण नसते, तिथे क्रियमाण कर्माच्या माध्यमातून कुणीही व्यक्ती तीव्र प्रारब्धाच्या कर्माचे फळ भस्म करून सर्व बंधनातून मुक्त होऊ शकते. अनेक पतित, दुष्ट, चांडाळ आणि खालच्या योनीत जन्मलेले जीवही त्यांच्या क्रियमाण कर्माद्वारे योग्य पुरुषार्थ साधून परम पद (भक्ताचे पद) प्राप्त करतात, हेच क्रियमाण कर्माचे महत्त्व आहे. त्यामुळे सतर्क राहून कर्म करा. साधना करणे, हेच खरे क्रियमाण कर्म आहे.’

– पू. तनुजा ठाकूर, संस्थापक, वैदिक उपासनापीठ (१५.११.२०२१)