विषय-वासनेत गुंतलेल्या राजकारण्यांकडून राष्ट्राची उन्नती होणे अशक्य !

पू. तनुजा ताईंचे मौलिक विचार

पू. तनुजा ठाकूर

‘आर्य चाणक्य म्हणाले आहेत, ‘राष्ट्रस्य मूलः इंद्रियनिग्रह:’ म्हणजे ‘जो आपल्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवतो, तोच राज्यकारभार चालवण्याचा खरा अधिकारी असतो.’ याउलट हल्ली राज्यकारभार तेच करत आहेत, जे इंद्रियांच्या विषय-वासनेत पूर्णपणे गुरफटून गेले आहेत. यावरूनच ‘काळ किती विपरीत दिशेने जात आहे’, हे आपण समजू शकतो. जितेंद्रिय (ज्यांनी इंद्रियांवर विजय मिळवला आहे) राजकारण्यांना सत्तेवर आरूढ करण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे अपरिहार्य झाले आहे; कारण आजच्या घृणास्पद राजकारणात प्रवेश करण्यास चारित्र्यवान, नीतीवान व्यक्ती संकोच करतात. तिथे जितेंद्रिय पुरुषांचा तर विचारच नको !’

– पू. तनुजा ठाकूर (६.११.२०२१)