२२ कोटी मुसलमान आता अल्पसंख्य नाहीत !  

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रहमान खान यांचा घरचा अहेर !

  • मुसलमानांनी मागण्या करण्याऐवजी समाजाला देण्यास चालू करावे !

  • राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात सहभाग घ्यावा !

‘रहमान खान यांचा हा सल्ला मुसलमान ऐकतील आणि त्यानुसार वागतील, अशी अपेक्षा करणे धाडसाचे ठरेल’, असाच विचार भारतियांच्या मनात येणार ! – संपादक

काँग्रेसचे नेते रहमान खान

बेंगळुरू (कर्नाटक) – देशातील मुसलमान आता अल्पसंख्य राहिलेले नाहीत. ते आता २२ कोटी इतके झाले आहेत. त्यांनी आता राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात त्यांचा सहभाग नोंदवला पाहिजे, असा घरचा अहेर काँग्रेसचे नेते रहमान खान यांनी मुसलमानांना दिला आहे. ते एका पत्रकार परिषदेत बोलत होते.

रहमान खान पुढे म्हणाले की,

१. मुसलमानांना विकासामध्ये योगदान देऊन चांगले नागरिक बनले पाहिजे. सरकारकडे सतत मागण्या करत बसण्यापेक्षा आता समाजाला काहीतरी देण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

२. राज्यघटनेच्या कलम १४,१५, आणि १६ च्या अनुसार जर कोणता समाज मागास रहात असेल आणि त्याला साहाय्याची आवश्यकता असेल, तर सरकार सकारात्मक राहून साहाय्य करू शकते.

३. काँग्रेस पक्ष धर्मनिरपेक्ष आहे आणि तो गेली ७० वर्षे धर्मनिरपेक्षतेचे रक्षण करत आहे. जर काँग्रेस धर्मनिरपेक्ष नसती, तर आज तिच्याकडे देशासाठी देण्यास काहीच नसते. (काँग्रेस धर्मनिरपेक्ष असती, तर या देशात हिंदूंची स्थिती दयनीय झाली नसती ! हिंदूंना ‘भगवे आतंकवादी’ आणि ‘देशाच्या साधनसंपत्तीवर पहिला अधिकार मुसलमानांचा आहे’, असे म्हटले गेले नसते ! भारताची फाळणी धर्माच्या आधारे झाली नसती ! – संपादक)