काबामधील ३६० मूर्ती नष्ट करणारे महंमद पैगंबर यांचेच अनुकरण त्यांचे अनुयायी करत आहेत !

  • बांगलादेशात धर्मांधांनी केलेल्या श्री दुर्गादेवी पूजेच्या मंडपांवरील आक्रमणांविषयी लेखिका तस्लिमा नसरीन यांचे विधान !

  • बांगलादेशातील सर्व मशिदी, मदरसे आणि धार्मिक कार्यक्रम बंद करण्याचीही मागणी

याविषयी भारतातील इतिहासकार, पुरो(अधो)गामी आणि निधर्मीवादी काही बोलत नाहीत, हे लक्षात घ्या ! – संपादक

नवी देहली – ‘महंमद पैगंबर यांनी सौदी अरेबियातील काबा शहरामध्ये मूर्तीपूजकांच्या ३६० मूर्ती नष्ट केल्या होत्या. त्यांचे अनुयायी त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत आहेत’, असे ट्वीट प्रसिद्ध बांगलादेशी लेखिका तस्लिमा नसरीन यांनी बांगलादेशमध्ये धर्मांधांनी श्री दुर्गादेवी पूजेच्या मंडपांतील देवीच्या मूर्तींवर केलेल्या आक्रमणांच्या पार्श्वभूमीवर केले आहे. ‘या घटना रोखण्यासाठी बांगलादेशातील सर्व मशिदी, मदरसे आणि अन्य धार्मिक कार्यक्रम पूर्णपणे बंद केले पाहिजेत’, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली. ‘बांगलादेशात दोन प्रकारचे लोक आहेत. एक म्हणजे जिहादी आणि दुसरे जिहाद्यांचे समर्थन करणारे’, असेही त्यांनी ट्वीट करतांना म्हटले आहे.