पुण्यात अपंगांचे आंदोलन !

  • सरकारी नोकरीतील अपंगांचे ४ टक्के आरक्षण रहित केल्याचे प्रकरण

  • पंतप्रधानांचा प्रतिकात्मक पुतळा आणि रक्त यांची तुला

(प्रतिकात्मक छायाचित्र)

पुणे – रेल्वे संरक्षण दल, पोलीस दल यांतील सरकारी नोकर्‍यांमध्ये अपंगांना देण्यात येणार्‍या ४ टक्के आरक्षणाचा कोटा रहित करण्याचा निर्णय केंद्र सरकारने नुकताच घेतला. या निर्णयामुळे अपंगांवर अन्याय होणार आहे. या निर्णयाच्या विरोधात प्रहार अपंग क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महेंद्र सातव यांच्या नेतृत्वाखाली काही अपंगांनी रक्तदान करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रतिकात्मक पुतळा आणि रक्त यांची तुला करून आंदोलन केले. अपंग कल्याण उपआयुक्त संजय कदम यांनी आंदोलनस्थळी येऊन निवेदन स्वीकारले.