६०० अंगणवाडी सेविकांनी निकृष्ट भ्रमणभाष प्रशासनाला परत केले !

निकृष्ट भ्रमणभाष देणार्‍या संबंधितांच्या विरोधात प्रशासनाने कारवाई करणे अपेक्षित आहे ! तुटपुंज्या वेतनावर काम करणार्‍या अंगणवाडी सेविकांना भ्रमणभाष दुरुस्तीसाठी व्यय करावा लागणे, हे प्रशासनासाठी लज्जास्पद आहे ! – संपादक 

अंगणवाडी सेविका

वर्धा – अंगणवाडी सेविकांना सरकारने दोन वर्षांपूर्वी भ्रमणभाष दिले होते; मात्र ते निकृष्ट दर्जाचे असल्याने गरम होणे, बंद पडणे यांसह अन्य समस्या येत आहेत. कामात खोळंबा होऊ नये; म्हणून दुरुस्तीसाठी नेले असतांना त्यांचा व्यय या सेविकांना मिळणार्‍या वेतनाइतका आहे. यामुळे अंगणवाडी सेविकांना हा आर्थिक भुर्दंड सहन करणे अशक्य आहे. तरी शासनाने चांगल्या दर्जाचे भ्रमणभाष द्यावेत, अशी मागणी करत महाराष्ट्र राज्य अंगणवाडी, बालवाडी संघटना, तसेच ‘आयटक’ संघटनेच्या वतीने वर्ध्यातील ६०० अंगणवाडी सेविकांनी त्यांचे भ्रमणभाष प्रकल्प अधिकार्‍यांना परत केले.