पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट !

डावीकडून पू. संभाजीराव भिडेगुरुजी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सांगली, २ ऑगस्ट (वार्ता.) – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सांगली जिल्ह्यात पूरग्रस्त भागात पहाणी करण्यासाठी दौर्‍यावर आले होते. या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीनंतर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट घेऊन चर्चा केली. सुमारे १५ मिनिटे बंद खोलीत ही चर्चा झाली.