विरार येथील आयसीआयसीआय अधिकोष लुटण्याचा प्रयत्न; महिला व्यवस्थापकाची चाकूने हत्या !

असुरक्षित वसई-विरार परिसर !

ठाणे, ३० जुलै (वार्ता.) – विरार पूर्व परिसरात असलेल्या आयसीआयसीआय अधिकोषाची शाखा २९ जुलैच्या सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास लुटण्याचा प्रयत्न झाला. याला विरोध करतांना अधिकोषाच्या व्यवस्थापक योगीता वर्तक आणि अन्य कर्मचारी श्वेता देवरूख यांच्यावर चाकूने चोरट्यांनी आक्रमण केले. या आक्रमणात योगीता वर्तक यांचा मृत्यू झाला आहे, तर घायाळ झालेल्या देवरूख यांच्यावर येथील संजीवनी रुग्णालयात उपचार चालू आहेत. अधिकोषाचे माजी व्यवस्थापक दुबे यांनी अधिकोष लुटण्याचा प्रकार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हा प्रकार घडला त्या वेळी बहुतांश कर्मचारी घरी गेले होते. घटनेनंतर दुबे पळून जात असतांना नागरिकांनी त्यांना पकडून पोलिसांच्या कह्यात दिले. याविषयी पोलीस अधिक अन्वेषण करत आहेत.