प्रत्येक क्षणी साधकांचा विचार करणारे आणि छोट्या छोट्या कृतीतून साधकांना शिकवणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘एके दिवशी मी आणि सहसाधक श्री. विक्रम डोंगरे मंत्रपठणाच्या सेवेसाठी प.पू. गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) खोलीत गेलो होतो. त्या वेळी प.पू. गुरुदेव तेथील कपाटाचा खण उघडून औषधे काढून घेत होते. ‘त्यांनी औषधे काढून घेतल्यावर तेथे पठणासाठी बसण्याची सिद्धता करूया’, असा विचार आम्ही दोघेही करत होतो. इतक्यात प.पू. गुरुदेवांनी औषधे काढून घेतली आणि लगेच खालच्या खणात ठेवलेली आसने काढून ते आम्हाला साहाय्य करू लागले. ते बघून ‘आम्ही घेतो’, असे आम्ही त्यांना म्हणालो. तेव्हा प.पू. गुरुदेव म्हणाले, ‘‘माझ्यामुळे तुम्हाला थांबावे लागले आणि तुमचा वेळ वाया गेला. त्यामुळे मी तुम्हाला साहाय्य करतो.’’

श्री. चेतन हरिहर

बर्‍याचदा आमच्या नियोजनाच्या अभावामुळे साधकांना कितीतरी घंटे वाट बघावी लागते. त्या वेळी आम्ही केवळ ‘क्षमा करा’, एवढेच सांगून निघून जातो. येथे प.पू. गुरुदेव मात्र एक मिनिटही विलंब झालेला नसतांना ‘आम्हाला थांबावे लागले’; म्हणून साहाय्य करत होते.

‘हे भगवंता, गुरुदेव केवळ मार्गदर्शनच करत नसून स्वतःच्या कृतीतून सर्व गोष्टी शिकवत असतात. असे महान गुरु आम्हाला लाभले, याविषयी तुझ्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– आपला चरणसेवक, श्री. चेतन हरिहर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.८.२०१९)

प.पू. गुरुदेवांकडून शिकायला मिळालेले सूत्र

श्री. अशोक रेणके

‘श्री. चेतन हरिहर यांनी अनुभवलेल्या वरील प्रसंगातून ‘प.पू. गुरुदेव इतरांच्या वेळेला किती महत्त्व देतात आणि इतरांचा किती विचार करतात’, हे शिकायला मिळाले.’ आमच्याकडून अशा चुका अनेक वेळा होत असतांनाही आम्ही त्यासाठी कोणतेच प्रायश्चित्त घेत नाही.’ – श्री. अशोक रेणके, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२५.८.२०१९)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक