‘प्रत्येक रुग्णालय हे ‘रुग्णसेवा’ या ब्रीदपासून दूर जाऊन ते वैद्यकीय धंद्याचा अड्डा झाल्याचे लक्षात आले. ‘सर्वसाधारण माणसाने पोलीस किंवा अधिवक्ता यांच्यापासून दूर रहावे’, अशी म्हण आहे. त्याप्रमाणेच ‘रुग्णालयाची पायरीही चढू नये’, हे मला अनुभवायला आले.’
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करा: https://sanatanprabhat.org/marathi/498555.html
ई. रखवालदाराने ‘यांना दुसर्या रुग्णालयात घेऊन जा’, असे सांगणे आणि ‘त्याच्या माध्यमातून देवच आला आहे’, याची निश्चिती होणे : आम्ही रुग्णालयातून खाली आल्यावर रखवालदाराने सांगितले, ‘‘या आधुनिक वैद्यांच्या नादी लागू नका. आधुनिक वैद्य रुग्णालयातच असतात; परंतु कर्मचारी ‘आधुनिक वैद्य रुग्णालयात नाहीत’, असे सांगतात. तुम्ही यांना दुसर्या रुग्णालयात घेऊन जा.’’ तेव्हा ‘एक सर्वसाधारण मनुष्य देव बनून येतो आणि मार्ग दाखवतो’, असे मला जाणवले. घरातील व्यक्तींनी मला दुसर्या रुग्णालयात भरती केले. तेव्हा तेथे एक साधक आले. तेव्हा ‘प्रत्यक्ष गुरुच त्या साधकाचच्या रूपात आले आहेत. आता मला मृत्यू आला, तरी देव पुढील प्रवास चांगला करून घेईल’, अशी माझी निश्चिती झाली.
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करा: https://sanatanprabhat.org/marathi/499023.html
– श्री. बबन वाळुंज, घाटकोपर, मुंबई.