दैवी बालके ही किती गोड गोड मुले

सौ. विमल कदवाने

दैवी बालके ही
किती गोड गोड मुले ।
देवाच्या कृपेने वेगवेगळ्या
घरांत फुललेली फुले ।। १ ।।

त्यांना पाहून पुष्कळ आनंद
होतो मनाला ।
भेटून क्षणभर विसरतो आपण
या जगाला ।। २ ।।

साधनेसाठी जन्म घेतला, तळमळ अती असे या जिवांना ।
गुरुमाऊलीच्या कृपेविना लाभले असते का
हे भाग्य आपल्याला ।। ३ ।।

दैवी बालकांचे माता-पिता यांनी धन्य समजावे स्वतःला ।
मायेत न अडकवता धर्मकार्यासाठी
प्रोत्साहन द्यावे बालकाला ।। ४ ।।

आंतरिक देवाच्या भक्तीने सांभाळतील ती हिंदु राष्ट्राला ।
देवाचे गुण अंगी बाळगून चालवतील
व्यवस्थित रामराज्याला ।। ५ ।।

‘भक्तीने शक्ती कशी वाढते’, हे शिकवतील जगाला ।
आपले शौर्य आणि गुण यांनी दूर करतील अंधाराला ।। ६ ।।

– सौ. विमल विलास कदवाने, बुरहानपूर (ब्रह्मपूर), मध्यप्रदेश. (३.४.२०१९)