कारगिल विजय दिनानिमित्त कारगिल गौरव पुरस्कार जाहीर !

पुणे – कारगिल विजय दिनानिमित्त सरहद आणि लडाख पोलिसांच्या वतीने कारगिल गौरव पुरस्कार प्रदान सोहळा २५ जुलै या दिवशी होणार आहे. लोकमतचे समूह संपादक विजय बाविस्कर, पुण्यभूषण फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई, आगा सैय्यद अब्बास, राकेश भान, डॉ. अपश्‍चिम बरंठ, डॉ. विजय कळमकर आणि डॉ. अनिल पाचणेकर हे या वर्षी होणार्‍या कारगिल गौरव पुरस्काराचे मानकरी असून हा कार्यक्रम मुकुंदनगर येथे होणार आहे. तर २६ जुलै या दिवशी शनिवारवाडा ते राष्ट्रीय युद्ध स्मारकापर्यंत कारगिल सद्भावना दौड काढण्यात येणार असल्याची माहिती सुरेंद्र वधवा आणि संजीव शहा यांनी पत्रकाद्वारे दिली.