फळांच्या खाली लपवून आणलेला ३ कोटी ७५ लाख रुपयांचा गांजा पुणे पोलिसांनी पकडला !

कोट्यवधी रुपयांचा अमली पदार्थांचा साठा सापडणे, हे सुरक्षा व्यवस्थेला लज्जास्पद !

जप्त केलेला गांजा

पुणे, १८ जुलै – पुणे-सोलापूर रस्त्यावरून अननस आणि फणस यांची वाहतूक करणार्‍या ट्रकमध्ये १ सहस्र ८७८ किलो गांजा पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. या गांजाची किंमत ३ कोटी ७५ लाख रुपये आहे, अशी माहिती पुण्याच्या महसूल गुप्तवार्ता संचलनालयाच्या (‘डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स’च्या) पोलिसांनी दिली आहे. ट्रक मधून हा गांजा आंध्रप्रदेशातून पुण्यामध्ये विक्रीस आणला जात होता. या ट्रकसमवेत एक मारुती गाडीहि होती. त्यातील चौघे आणि ट्रकमधील दोघे, असे मिळून ६ आरोपींना अटक केली आहे. अटकेतील आरोपींनी गुन्ह्याची स्वीकृती दिली आहे.