पणजी – गोव्यात १४ जुलै या दिवशी कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दिवसभरात २२७ नवीन रुग्ण आढळले आहेत. चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाबाधित आढळण्याचे प्रमाण ४ टक्के आहे. दिवसभरात १७१ रुग्ण बरे झाले. यामुळे प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या आता १ सहस्र ७८८ झाली आहे.