धर्माप्रती असलेल्या अमर्याद निष्ठेतच खरी स्त्रीशक्ती सामावलेली असणे

एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा ढोंगीपणा

स्वतः नास्तिक असून उघडपणे हिंदु धर्म आणि धार्मिक कृती यांचा अवमान करणे; मात्र स्वतःच्या पत्नीला पूजा-विधी, यज्ञयाग, तसेच स्वतःच्या स्वार्थासाठी अनेक धार्मिक कृती करण्याची अनुमती देणे : एका राज्यातील एका पक्षाचे नेते नास्तिक आहेत. ते अन्य नास्तिक लोकांच्या साहाय्याने उघडपणे हिंदु धर्म आणि धार्मिक कृती यांचा अवमान करत आहेत. ते त्यांच्या मनात ब्राह्मण समाजाप्रती असणारा द्वेष उघडपणे व्यक्त करत आहेत. त्यांच्या पत्नीची हिंदु धर्म आणि देवता यांच्याप्रती उत्कट श्रद्धा आहे. अनेक जण त्यांची या निष्ठेमुळे प्रशंसा करतात. ते स्वतःच्या पत्नीला पूजा-विधी, यज्ञयाग, तसेच स्वतःच्या स्वार्थासाठी अनेक धार्मिक कृती करण्याची अनुमती देतात. हे सर्व करतांना ते असे भासवतात की, ‘मी कुणालाच अगदी पत्नीलाही धर्माचरण करण्यापासून अडवत नाही.’ किती हा ढोंगीपणा !’

– एक साधिका (१४.५.२०२१)

१. पंचकन्यांपैकी मंदोदरी आणि तारा यांची धर्माप्रती असलेली अपार श्रद्धा

(पू.) सौ. उमा रविचंद्रन्

१ अ. रावणाची पत्नी मंदोदरी हिने रावणाला श्रीरामाची महानता सांगून सीतामातेला सोडण्याची विनंती करणे : ‘येथूनच माझी धर्मातील अतीसूक्ष्म भेद लक्षात घेण्याची विचारप्रक्रिया चालू झाली. आपल्या धर्मशास्त्रातही अनुकरणीय महिलांची उदाहरणे आहेत. रामायणात रावणाची पत्नी मंदोदरी आदर्श महिलेचे उत्तम उदाहरण आहे. रावणाने सीतेचे अपहरण केल्यावर मंदोदरीने त्याला दुष्कर्म थांबवण्याचा सल्ला दिला आणि श्रीरामाचा आदर करून सन्मानाने सीतामातेला सोडण्याची विनंती केली. तिने रावणाला श्रीरामाची महानता सांगून त्याच्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी पुष्कळ प्रयत्न केले; पण सर्व व्यर्थ ठरले. तमिळ भाषेत रामायण लिहिणार्‍या कंबर यांनी ‘कंब रामायणा’त मंदोदरीची कीर्ती वर्णिली आहे. ते लिहितात, ‘जर सीतामाता चंदनाच्या झाडावर चिकटलेल्या चमेलीच्या लतेसारखी आहे, तर रावणाची पत्नी मंदोदरीही चमेलीच्या लतेसारखी आहे; पण ती रानटी (वन्य) झाडाला चिकटलेली आहे.’ मंदोदरी अतिशय सुंदर दिसत असल्याने तिला पाहून हनुमानाला ‘हीच सीतामाता आहे का ?’, असा प्रश्न पडला नव्हता, तर त्या वेळी मंदोदरीचा तोंडवळा अतिशय दिव्य तेजाने चमकत होता.

१ आ. वालीने सुग्रीवाची पत्नी रूमा हिचे अपहरण केल्यावर त्याची पत्नी तारा हिने त्याला श्रीरामाची महानता सांगून या दुष्कृत्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करणे : दुसरे उदाहरण म्हणजे वालीची पत्नी तारा. वालीने सुग्रीवाची पत्नी रूमा हिचे अपहरण केले. त्या वेळी वालीची पत्नी तारा हिने त्याला साक्षात् महाविष्णूचा अवतार असणार्‍या श्रीरामाची महानता सांगून या दुष्कृत्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला; मात्र वालीने तिचे ऐकले नाही आणि स्वतःचा मृत्यू ओढवून घेतला. ताराच्या अंगभूत धार्मिक वृत्तीमुळे तिचा मुलगा अंगद श्रीरामाचा भक्त बनून स्वतःला श्रीरामाच्या कार्यात झोकून देतो.

मंदोदरी आणि तारा यांच्या धर्माप्रती असलेल्या अपार श्रद्धेमुळे त्यांची गणना पंचकन्यांत केली आहे.

२. थिलगवथियार आणि मदुराईचा राजा कून पंडियान याची राणी मंगयार्करसियर यांनी इतर धर्मांत गेलेल्यांना हिंदु धर्मात पुन्हा आणणे

२ अ. हिंदु धर्माप्रती असलेली श्रद्धा आणि भक्ती यांच्या बळावर थिलगवथियार यांनी जैन धर्म स्वीकारलेल्या स्वतःच्या भावाला आणि मंगयार्करसियर यांनी स्वतःच्या पतीला हिंदु धर्मात परत आणणे : सध्याच्या काळात तमिळनाडू या राज्यातील आदर्श भक्त असलेल्या थिलगवथियार आणि मंगयार्करसियार या स्त्रियांची उदाहरणे डोळ्यांसमोर येतात. थिलगवथियार हिचा भाऊ अप्पर स्वामीगल याने जैन पंथ स्वीकारल्यावर तिने त्याला हिंदु धर्मात परत आणले. अशाच प्रकारे मंगयार्करसियर हिनेही स्वतःचा पती, म्हणजे मदुराईचा राजा कून पंडियान याने जैन पंथ स्वीकारल्यावर त्याला हिंदु धर्मात परत आणले. यासाठी तिने राज्यातील निष्ठावंत मंत्री कुलचिरई नयनार यांचे साहाय्य घेऊन अप्पर आणि थिरुज्ञानसंबंदर यांना स्वतःच्या राज्यात बोलावून घेतले.

२ आ. नातेवाइकांच्या दबावाला बळी न पडणे : हिंदु धर्माप्रती असलेली श्रद्धा आणि भक्ती यांमुळे या दोघी नेहमीच तार्‍यांप्रमाणे चमकत राहिल्या. स्वतःचे नातेवाइक हिंदु धर्माविरुद्ध गेले असतांनाही त्या त्यांच्या दबावाला बळी पडल्या नाहीत. त्या केवळ स्वतः धर्माप्रती निष्ठावंत राहिल्या नाहीत, तर त्यांनी स्वतःच्या नातेवाईकांना धर्मात परत आणले. हीच खरी स्त्रीशक्ती आहे. ‘इतरांच्या वाईट कृत्याविषयी स्वीकृती दर्शवणे किंवा त्यांचे आज्ञापालन करणे’, ही स्त्रीशक्ती नसून धर्माप्रती असलेल्या अमर्याद निष्ठेतच खरी स्त्रीशक्ती सामावलेली आहे.’

– (पू.) सौ. उमा रविचंद्रन्, चेन्नई, तमिळनाडू. (१४.५.२०२१)

श्रीविष्णूचा प्रिय भक्त म्हणून गौरवलेल्या बिभीषणाने धर्मासाठी स्वतःच्या दुष्ट प्रवृत्तीच्या भावाचा त्याग करणे

‘धर्माचे रक्षण करणे आणि धर्माची हानी होऊ नये, यासाठी प्रयत्न करणे’, हा खरा ‘विशेष’ धर्म आहे. ‘सामान्य’ धर्म बाजूला ठेवून केवळ ‘विशेष’ धर्माचे पालन केले पाहिजे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे बिभीषण ! धर्मासाठी, प्रभु श्रीरामासाठी त्याने दुष्ट प्रवृत्ती असलेल्या स्वतःच्या भावाचा त्याग केला. श्रीविष्णूचा प्रिय भक्त म्हणून आजही त्याचे स्मरण आणि गौरव केला जातो.’

– (पू.) सौ. उमा रविचंद्रन्, चेन्नई, तमिळनाडू.