हिंगोली येथे चोरट्यांनी पोलीस कर्मचार्‍याचे घर फोडून ७५ लाख रुपयांचा माल पळवला !

जिथे पोलीस चोरांपासून सुरक्षित नसतील, तर तेथे सर्वसामान्य जनता सुरक्षित असेल का ?

हिंगोली – येथील पोलिसांच्या नवीन वसाहती येथे रहाणारे पोलीस कर्मचारी रवि सावळे यांचे घर फोडून चोरट्यांनी दागिने आणि रोख रक्कम, असा एकूण ७५ लाख रुपयांचा माल पळवला. या प्रकरणी १२ जुलै या दिवशी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पोलिसांच्या नवीन वसाहतीत अनुमाने १६८ निवासस्थाने असून एका इमारतीमध्ये ८ कुटुंबांसाठी निवासस्थाने आहेत. या ठिकाणी अधिकारी आणि कर्मचारी रहातात. (पोलीस वसाहतीमध्ये चोरी होणे, हे पोलीसदलाला लज्जास्पद आहे. हिंगोली शहरात चोर्‍यांचे प्रमाण वाढल्याने नागरिक आणि व्यापारी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे ही गोष्ट गांभीर्याने घेऊन पोलिसांनी चोरांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे.  – संपादक)