‘कोरोना’ने मला शिकवले काय ?

सौ. कविता बेलसरे

‘कोरोना’ने मला शिकवले काय ।
देवाविना कुणी
कुणाचे नाय ।। १ ।।

वेळेची किंमत शिकवली ।
आयुष्याची किंमत कळली ।। २ ।।

स्वावलंबन अन् काटकसर
करायला शिकवले ।
तत्परता अन् सावधानता
शिकवली ।। ३ ।।

‘कोरोना’ने अंतर्मुख व्हायला लावले ।
आपले कुठे चुकते, ते शोधायला लावले ।। ४ ।।

गुरूंची दूरदृष्टी लक्षात आणून दिली ।
साधकांकडून नामजपादी व्यष्टी साधना करवून घेतली ।। ५ ।।

स्वभावदोष-अहं निर्मूलन करायला शिकवले ।
साधनेचे महत्त्व पटवून
गुरूंचे श्रेष्ठत्व लक्षात आणून दिले ।। ६ ।।

मनाला मायेतून सोडवले ।
ईश्वराशी अनुसंधान ठेवायला शिकवले ।। ७ ।।

– सौ. कविता बेलसरे, पुणे (मे २०२०)

या कवितेत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक