‘गेले २ दिवस माझे मन गुरुसेवेची वाट शोधत होते. एक-एक प्रसंग असा घडत होता की, ज्यांत गुरु आणि गुरुसेवा यांच्याकडेच माझे मन ओढले जात होते. ५.१२.२०२४ या दिवशी संकलन केलेल्या धारिकेवरील निरोप वाचून गुरूंनी साद घातल्याची जाणीव झाली. तो निरोप वाचून माझी जी अवस्था झाली त्यावरून मला गुरुकृपेनेच काही शब्द स्फुरू लागले. माझ्या मनाच्या त्या अवस्थेत स्फुरलेले शब्द सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांच्या चरणी अर्पण करतो.’
अंतरंग कळे तुम्हाला ।
परि मज का न उमजे ।। १ ।।
माऊली म्हणती तुम्हासी ।
साक्ष का मी मागतसे ।। २ ।।
शंका मनीची का न फिटे ।
शरणागत नसे मी पामर ।। ३ ।।
अहंभावे ओळखू न शके ।
परि दया करिता मजवरी ।। ४ ।।
क्षमा करा हो गुरुनाथा ।
क्षमा करा हो दयाघना ।। ५ ।।
हा देह सदा तुमचा असे ।
हे जीवन सदा तुमचे असे ।। ६ ।।
– श्री. धैवत विलास वाघमारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.१२.२०२४)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |