(म्हणे) ‘भारत अफगाणिस्तानचा वापर पाकमध्ये आतंकवादी कारवायांसाठी करत आहे !’

पाकचे राष्ट्रपती आरिफ अल्वी यांच्या उलट्या बोंबा !

  • पाकनेच अनेक वर्षे अफगाणिस्तानमधील तालिबान्यांना, तसेच अल् कायदाला सर्वप्रकारचे साहाय्य केले होते, हे स्वतः पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनीच सांगितलेले आहे. याविषयी अल्वी का बोलत नाहीत ?
  • पाक भारताच्या विरोधात गेली ३ दशके जिहादी आतंकवादी कारवाया करत आहे, हे जगजाहीर आहे. त्याविषयी अल्वी का बोलत नाहीत ?
पाकचे राष्ट्रपती आरिफ अल्वी

इस्लामाबाद (पाकिस्तान) – भारत आमचा शेजारी देश अफगाणिस्तानमध्ये आतंकवादाला समर्थन देत आहे. तेथील भूमीचा वापर पाकच्या विरोधात आतंकवादी कारवाया आणि युद्ध यांसाठी करत आहे. भारत असे पाकला अस्थिर करण्यासाठी करत आहे. नुकतेच लाहोर येथे हाफीज सईद याच्या घराबाहेर झालेला स्फोट भारताच्या समर्थनाद्वारे करण्यात आला होता. भारत आतंकवादी संघटनांना पैसे देऊन पाकला अस्थिर करण्याचे षड्यंत्र रचत आहे, असे आरोप पाकचे राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी केले आहेत. पाकिस्तानी राष्ट्रपतींच्या कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकामध्ये हे आरोप करण्यात आले आहेत. अल्वी यांनी यापूर्वीही भारतावर अशाच प्रकारचे आरोप केले होते. त्या वेळी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने याचा विरोध केला होता.

पाकिस्तानी राष्ट्रपती अल्वी यांनी काही दिवसांपूर्वी तुर्कस्तानचे सैन्यदलप्रमुख जनरल उमित दुंदार यांची भेट घेतल्यावरही भारतावर आरोप केले होते. त्यांनी म्हटले होते की, भारत अफगाणिस्तानमध्ये आतंकवाद्यांना प्रशिक्षण आणि पैसे देत आहे. अशा वेळी तुर्कस्तानने पाकला साहाय्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले होते.