सहज बोलण्यातूनही ईश्वरी ज्ञान प्रकट करणारे प.पू. दास महाराज

प.पू. दास महाराज

‘एप्रिल २०२० मध्ये एकदा प.पू. दास महाराज आणि माझ्यात ‘हिंदु राष्ट्राची स्थापना, ते येण्याची प्रक्रिया कशी असेल ? त्यातील टप्पे कोणते ?’, या विषयांवर संभाषण चालू होते. त्या कालावधीत प.पू. दास महाराज १० मिनिटे याविषयी बोलत होते. तेव्हा मला आठवले की, साधारण २ वर्षांपूर्वी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या प्रक्रियेविषयी मला सूक्ष्मातून ज्ञान मिळाले होते. या ज्ञानात आणि प.पू. दास महाराज यांनी सांगितलेल्या बर्‍याच सूत्रांमध्ये साम्य आहे. तेव्हा ‘प.पू. दास महाराज यांच्या सहज बोलण्यातूनही ईश्वरी ज्ञान प्रकट होत असते’, हे लक्षात आले.’

– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.४.२०२०)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक