प.पू. दास महाराज साधकांसाठी नामजप करण्यापूर्वी आणि नामजप करतांना साधिकेला आलेल्या अनुभूती

१. प.पू. दास महाराज नामजप करण्यासाठी येण्यापूर्वी खोलीत सुगंध येणे

सौ. विद्या नलावडे

‘३१.१.२०२० या दिवशी मी सायंकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत परात्पर गुरु डॉ. आठवले पूर्वी निवासाला असलेल्या खोलीत प्रथमच बसून नामजप करत होते. तेथे बसून प.पू. दास महाराज साधकांसाठी नामजप करणार होते. ते खोलीत येण्यापूर्वीच खोलीत सर्वत्र सुगंध पसरला होता.

२. प.पू. दास महाराज नामजप करतांना आलेल्या अनुभूती

अ. प.पू. दास महाराज नामजपाला बसल्यावर मला गुरुदेव आणि प.पू. दास महाराज यांच्याप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटून माझा भाव जागृत झाला.

आ. माझा नामजप श्वासाला जोडून आणि भावपूर्ण होत होता. माझे आपोआप ध्यान लागले.

इ. ‘माझ्यातील आत्माराम आणि प.पू. दास महाराज’ एवढेच मला आठवत होते. त्या कालावधीत मला स्वतःचा विसर पडला होता.

ई. मला मधेच गुरुदेवांचे स्मरण होऊन ‘गुरुदेवांचा हात माझ्या डोक्यावर आहे आणि त्यांच्या हातातून मोठ्या प्रमाणात चैतन्याचा स्रोत माझ्या शरिरावर येत असून सहस्रारचक्रातून चैतन्य माझ्या संपूर्ण शरिरात जात आहे’, असे मला जाणवले. मला सहस्रारचक्रावर संवेदना जाणवून माझे मन पुष्कळ आनंदी झाले.’

– सौ. विद्या नलावडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.१.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक